Operation Sindoor: पाकिस्तान सायरनची वाट पाहत राहीला अन् भारताने थेट हल्लाच केला

नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ठोस पाऊल उचलले आहे. हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी देशभरात युद्ध परिस्थितीचा सराव करण्यासाठी मॉक ड्रिल करण्याची घोषणा केली होती. देशभरातील निवडक ठिकाणी युद्धसदृश सायरन वाजवण्यात आले.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर भारताच्या या हालचालीकडे लक्ष ठेवून होते. त्यांना वाटले होते की भारत केवळ धमक्या देत आहे. पाकिस्तान भारताच्या मॉक ड्रिलवर लक्ष ठेऊन होते. भारताचा सायरन वाजण्याची वाट पाहत असतानाच भारताने प्रत्यक्षात धक्का देणारी कारवाई करत पाकव्याप्त दहशतवादी स्थळांवर एअर स्ट्राईक केला.
भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. या कारवाईमुळे पाकिस्तानची मोठी धांदल उडाली.
पाकिस्तान भारतावर आरोप करू शकत नाही
पाकिस्तान आता भारतावर थेट युद्ध छेडल्याचा आरोप करू शकत नाही कारण भारतीय सैन्याने फक्त दहशतवादी अड्ड्यांनाच लक्ष्य केले. भारताने दाखवून दिले की कोणतीही परकीय शक्ती भारतीय नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेण्यापासून त्यांना रोखू शकत नाही.