आमिर खानने हिंदू धर्मावर केलेलं 'हे' वक्तव्य चर्चेत

आमिर खानने हिंदू धर्मावर केलेलं 'हे' वक्तव्य चर्चेत

मुंबई - बॉलिवूडमधील 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान सध्या त्याच्या नव्या चित्रपट ‘सितारे जमीन पर’ च्या प्रमोशनमुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं धर्म, विशेषतः हिंदू धर्माविषयी आपले विचार मांडले असता तो म्हणाला, "मला हिंदू धर्मातील काही गोष्टी खूप आवडतात." त्याच हे विधान सोशल मीडियावर आणि चर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. धर्मासारख्या संवेदनशील विषयावर मत मांडलं. धर्म हा फार खाजगी विषय आहे. मी सार्वजनिकरित्या यावर फारसं बोलत नाही. पण मी सर्व धर्मांचा आणि त्यांच्या शिकवणीचा आदर करतो असंही तो म्हणाला.  

आमिर खान पुढे म्हणाला, "जेव्हा मी लोकांना भेटतो, तेव्हा त्यांच्या धर्माकडे पाहत नाही, मी व्यक्तीकडे पाहतो." धर्माच्या बाबतीत सर्वसमावेशक दृष्टिकोन असलेल्या आमिरनं गुरु नानक यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेतल्याचंही नमूद केलं.

विशेष म्हणजे, आमिरनं भगवान कृष्णाच्या भूमिकेबाबतही आपली इच्छा व्यक्त केली. “भगवान कृष्णानं माझ्यावर मोठा प्रभाव टाकला आहे. त्यांच्या कथा आणि भगवद्गीता खूप काही शिकवते. भविष्यात मला त्यांची भूमिका साकारायची आहे. बघूया, हे शक्य होतं का,” असं त्यानं सांगितलं. याआधी त्यानं ‘महाभारत’ सिनेमावर काम करण्याची इच्छाही बोलून दाखवली होती.

दरम्यान, ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. २० जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं आतापर्यंत १०९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, आमिर खाननं हा चित्रपट कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज न करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी आलेल्या अनेक मोठ्या ऑफर्स त्यानं नाकारल्या आहेत.