HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला मिळणार ?

विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला मिळणार ?

मुंबई : राज्यातील 15 व्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळावे  एवढे संख्याबळ विरोधी बाकांवर बसलेल्या एकाही पक्षाकडे नाही. विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या दहा टक्के आमदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद देण्याची तरतूद आहे. परंतु महाविकास आघाडीकडे  निवडणुकीपूर्वी झालेल्या आघाडीमुळे एकत्रितपणे 48 सदस्य आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आणि महाविकास आघाडीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, आता हे पद ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार आहे. गेल्या सरकारमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे तर विधान परिषदेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे होते. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेत शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहत होते.

यावेळी निवडणुकीत मिळालेला कौल हा विरोधी पक्षनेता बनवू शकत नाही. परंतु, यासाठी विधानसभा अध्यक्षांची मर्जी असेल व निर्णय घेत असतील तरच विरोधी बाकाला नेता मिळू शकतो. अन्यथा, प्रत्येक गटनेत्यांवर त्या पक्षाची जबाबदारी अवलंबून असेल.

सर्वाधिकार विधानसभाध्यक्षांकडे 

विरोधी पक्षनेतेपदाचे हे घटनेने दिलेले पद आहे. राजकारणात विरोधी पक्षनेते हे मुख्यमंत्र्यांच्या समकक्ष असते. जेवढे अधिकार व मान सन्मान मुख्यमंत्र्यांना असतो, तेवढाच या पदाला असते. सभागृहात विरोधी पक्षनेते उभे झाल्यास विधानसभाध्यक्षही त्यांना प्राधान्य देतात. अशावेळी सामूहिक नेता निवडल्यास विरोधी पक्षनेता देता येणे शक्य आहे. परंतु, हा सर्वाधिकार विधानसभाध्यक्षांकडे आहे. त्यावर नवे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अनिल परब, सुनील प्रभू तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नसीम खान उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.