विश्वास पाटील अमृतमहोत्सवी गौरव समितीमार्फत ‘आबाजीश्री’ स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समितीच्यावतीने गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्य गोकुळ दूध संघाशी संलग्न असणाऱ्या दूध उत्पादकांच्या जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हैशी व गाईसाठी ‘आबाजीश्री’ स्पर्धा आयोजित केली आहे.
ही ‘आबाजीश्री’ स्पर्धा दि. ११ मार्च २०२५ ते २०मार्च २०२५ या कालावधीत कोणत्याही दिवशी घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूध उत्पादक यांनी आपल्या संस्थेच्या लेटर हेडवर चेअरमन/सचिव यांच्या सही शिक्क्यानिशी संघाच्या बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, उदगाव व ताराबाई पार्क येथील कार्यालयात दि.१० मार्च २०२५ रोजी अखेर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी म्हैस कमीत कमी १२ लिटर प्रतिदिनी व गाय २० लिटर प्रतिदिनी दूध देणारी असणे आवश्यक आहे.
अ.क्र. |
बक्षीस क्रमांक |
म्हैस |
गाय |
|
१ |
प्रथम क्रमांक |
५१,०००/- |
५१,०००/- |
|
२ |
द्वितीय क्रमांक |
३५,०००/- |
३५,०००/- |
|
३ |
तृतीय क्रमांक |
२५,०००/- |
२५,०००/- |
|
स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती स्वतंत्र परिपत्रकाने प्राथमिक दूध संस्थांना कळविण्यात आली असून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व अमृतमहोत्सवी गौरव समितीमार्फत आयोजित केलेल्या या ‘आबाजीश्री’ स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.