लोकसेवा महासंघ यांची कोरोना काळातील कर्जमाफीसाठी जल निदर्शने
कोल्हापूर प्रतिनिधी योगेश कांबळे.
कोल्हापूर येथे दिनांक २३/०३/२३ रोजी लोकसेवा महासंघाच्या वतीन पंचगंगा नदी घाट येते कोरोना काळात बळी पडलेल्या कुटूंब प्रमुख मुळे घरची जबाबदारी पडलेल्या महिलांची कर्ज माफ करण्यात यावी या मागणीसाठी जलनिदर्शन करण्यात आले.याचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष श्री. उत्तम कागले यांनी केले. सरकार निवेदन देऊन सुद्धा दखल घेत नाही की चर्चा करण्यास तयार नाही परिणामी या सरकाचे लक्ष वेधण्यासाठी इशारा म्हणून जलनिदर्शन करण्यात आले आहे जर सरकारने कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले नाही तर राज्यभर जलसमाधी आंदोलन केले जाईल असे ही कागले यांनी सांगितले. सध्या मार्च महिना चालु आहे बँका वसूली तगादा लावत आहेत . दोन वेळेचे खाण्यासाठी जगायचे की मुलांना शिकवण्यासाठी जगायचे का या बँकाचे कर्ज भरण्यासाठी जगायचे अशी द्वितीय अवस्था झाल्याचे यावेळी काही कर्जदार महिलांनी आपले दुःख व्यक्त केले. म्हणुनच अशी जीवाची घालमेल करणारी आणि आयुष्य पणाला लागलेली व्यथा हे सरकार सोडवनार का? अशा निर्धार महिलांचे आधारवड होणार का ? कर्ज माफी करुन यांना जगण्यास हक्क देणार का ? कारण या महामाराईत संपूर्ण जग खाईत लोटले होते यातून गरीब श्रीमंत कोण्ही हि मागे राहिले नाही. माञ जेंव्हा महामारी ओसरली तेंव्हां कित्येक कुटूंब उध्वस्त झाली होती, आर्थिक घडी कोडमडली होती, रोजगार गेले होते आशा अवस्थेत काहींनी घर तारण कर्ज घेतली होती त्याची मात्र आता डोक्यावरील छत जाण्याची वेळ आली कारण घरातील कर्ता पुरुष त्या कुटुंबाचा प्रमुख तारणहर्ता हरपला होता.
म्हणुनच अशा कर्जबाजारी महिलांना दिलासा मिळावा त्यांना कर्जमाफीत प्राधान्य मिळावे म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला जिल्यातील महीला पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होतेच पण कर्जदार महिलांनी ही आवर्जून उपस्थिती लावली होती.