शरद इन्स्टिट्यूटमध्ये संविधान दिन साजरा

शरद इन्स्टिट्यूटमध्ये संविधान दिन साजरा

यड्राव (प्रतिनिधी) : येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील ग्रंथालयात भारतीय संविधान दिन संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणी प्राचार्य डॉ. संजय खोत यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. 

यावेळी ग्रंथपाल युवराज पाटील यांनी संविधानाची प्रस्तावना वाचली. त्यानंतर संविधानाची माहिती दिली. यावेळी ग्रंथालयात संविधान विषयांच्या पुस्तकांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी मांडण्यात आले होते. 

यावेळी डिन प्रा. बाहुबली संगमे, प्रा. के. ए. कुपाडे, डॉ. सुयोग पाटील, डॉ. कृष्णकांत साहू, प्रा. कौस्तुभ शेडबाळकर, रजिस्ट्रार प्रा. दिग्विजय शिंदे, राहुल लेंजे,  किशोरी गरड, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.