महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा परळे निनाई/वाकोली तर्फे संविधान दीन साजरा

परळे (प्रतिनिधी) : आज मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा परळे निनाई/वाकोली तर्फे निनाई हायस्कूल परळे निनाई, येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.
त्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दळवी व त्यांचा संपुर्ण स्टाप उपस्तिथ होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम साहेब यांचे यावेळी मोलाचे मार्गदर्शन मुलांना लाभले.
विद्यार्थ्यांना व शाळेसाठी संविधानाची फोटो फ्रेम, भेट म्हणून देण्यात आली. त्या प्रसंगी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम ता. मनसे कडवे पंचायत समिती विभाग अध्यक्ष, मिलिंद विलास घोलप, इ.सर्व तालुका स्तरीय पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी गावातील मनसे शाखा अध्यक्ष आनंद चौगुले, शाखा सचिव संतोष साबळे, उपसचिव शिवाजी बोडके,शाखा उपसरचिटणीस अशोक मोरे, गट अध्यक्ष राम सुतार,सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. हा कार्यक्रम मनसे शाखा परळे निनाई/वाकोली ,सर्व पदाधिकारी यांच्या अधिपत्यखाली करण्यात आला. .