सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश...

सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश...

       उंचगाव येथील सतेज पाटील समर्थकांनी तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. लेटस ग्रुपचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह उचगाव येथे सुरु असलेल्या नमो चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धेदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला.

    यावेळी अमल महाडिक यांच्या हस्ते या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार अमल महाडिक यांनी विकास कामांच्या माध्यमातून विरोधकांच्या टीकेला उत्तर देत असल्यामुळेच अनेकजण आपल्या सोबत येत आहेत, असे मत व्यक्त केले. केवळ विरोधासाठी विरोध करणे आमची संस्कृती नाही अशी उपरोधिक टीका महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता केली. 

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये अमल महाडिक पदावर नसतानाही विकास कामे करत आहेत आणि काँग्रेस मात्र टीकाटिप्पणी आणि अडवणूकचे राजकारण करत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उचगाव मधून अमल महाडिक यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला. 

          यावेळी ऋषिकेश कांबळे, अभिजीत सावंत, गणेश मस्कर, अक्षय परीट, दीपक अंगज, गणेश पोवार, अक्षय गावडे, रोहित धामणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.