भोगावती साखरविक्री,त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करुन योग्य कारवाई, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर

भोगावती साखरविक्री,त्रयस्थ यंत्रणेमार्फत  चौकशी  करुन योग्य कारवाई, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर

राधानगरी प्रतिनिधी : निवास हुजरे 

स्वाभिमानी संघटनेने भोगावतीच्या साखर विक्री बाबत  जिल्हा पोलीस प्रमुख, प्रादेशिक   साखर सहसंचालकांसह आमच्याकडे निवेदनाद्वारे केलेल्या मागणीनुसार आम्ही त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशी करत आहोत,या चौकशीतुन जो निष्कर्ष निघेल त्यानुसार  कारवाई करु असे भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर व संचालकमंडळाने पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. 

 श्री.पाटील पुढे म्हणाले की,साखर परस्पर विक्री करण्याचा स्वाभिमानी संघटनेकडून वारंवार आरोप होत आहे. यातुन कारखान्याची नाहक बदनामी होत आहे. आजपर्यतच्या आरोपामध्ये काहीही तथ्य आढळलेले नाही. भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन या उठाठेवी सुरु आहेत.पण निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांचे वाभाडे काढुया,विनाकारण भोगावतीची बदनामी करु नका असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. तर साखरविक्री कायदेशीर मार्गाने होते आणी झाली आहे. कारखान्यातुन बाहेर पडलेला ट्रक कोठे जातो?याची चौकशी आम्ही का करावी,पोलीस योग्य तो तपास करतीलच.यावेळी कार्यकारी संचालक संजय पाटील -पिरळकर, ज्येष्ठ संचालक कृष्णराव किरुळकर, ए.डी.पाटील, बी.आर.पाटील,हिंदुराव चौगले,संजयसिंह पाटील,शिवाजी कारंडे,प्रा.सुनील खराडे,डी.आय.पाटील,धिरज डोंगळे,रवि पाटील यांचेसह अन्य संचालक उपस्थित होते.