सर्वोदय विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त विद्यालयातील लिपिक अनिल पवार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

सर्वोदय विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त विद्यालयातील लिपिक अनिल पवार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

मिरज:- संजय पवार

सांगली येथील सर्वोदय विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शाळेतील लिपिक अनिल पवार यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले.महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्व व माहिती शाळेतील जेष्ठ शिक्षक अशोक वाघमोडे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष जी. के. पवार (दादा), सचिव आनंदराव पाटील (काका), संचालक दादूलाल पठाण, विजय पाटील विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुचेता म्हेतर यांनी केले, तर आभार वा. के. सवाईकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद गावडे यांनी मांडले.