सानिया मिर्झाने केली भारत सरकारकडे 'ही' मागणी

सानिया मिर्झाने केली  भारत सरकारकडे 'ही' मागणी

मुंबई : सानिया मिर्झा ही कायमच  चर्चेत असते. सानियाचा  पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबच घटस्फोट झाला आहे. घटस्फोट घेतल्यानंतरही सानियाने अद्याप दुबई सोडले नाहीये. ती दुबईत आपल्या मुलासोबत राहते. 

सानिया ही दुबईत राहत असली तरीही ती कायमच भारतात येते. तिने नुकतीच ईद देखील भारतात आपल्या कुटुंबियांसोबत साजरी केली. सानिया मिर्झाची दुबईत टेनिस अकादमी आहे. सानियाने भारत सरकारकडे मोठी मागणी केली आहे. एका पॉडकास्ट कार्यक्रमात सानियाला क्रीडा क्षेत्राबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिने थेट मोठी मागणीच करून टाकली. यावेळी तिच्यासमोर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू देखील उपस्थित होते.

सानिया मिर्झा म्हणाली की, एक क्रीडा देश बनण्यासाठी देशातील प्रत्येक खेळाला सपोर्ट करणारी यंत्रणा नक्कीच असायला हवी. दुर्दैवाने आपण क्रिकेट खेळणारा देश आहोत. एक गोष्ट स्पष्ट आहे की, क्रीडा देश बनण्यासाठी यंत्रणा सरकारकडून राज्यांपर्यंत आणि नंतर खेळाडूंकडे येते. मुळात म्हणजे या गोष्टींबद्दल पालकांना देखील माहिती पाहिजे. माझ्या पालकांना देखील माहिती नव्हते. मला टेनिसमध्ये आवड होती. त्यांचे म्हणणे असायचे की, ठीक आहे.

  

पुढे सानिया मिर्झा म्हणाली, क्रिकेट सोडून इतर खेळांमध्ये पुढे जाण्याची व्यवस्था नक्कीच निर्माण करावी लागणार आहे. सानिया मिर्झा हिने तिच्या बोलण्यातून एकप्रकारे सरकारला सर्व खेळांना पुढे नेण्यासाठीची मागणीचे केलीये. देशात फक्त क्रिकेटवरच लक्ष  दिले जात असल्याचेही तिने म्हटले.