क्रिकेटर मोहम्मद सिराज लग्न करणार?, चर्चांना उधाण

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद सिराज लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
सिराज टेलिव्हिजन अभिनेत्री आणि बिग बॉस 13 फेम माहिरा शर्मा भारतीय क्रिकेटर मोहम्मद सिराजला डेट करत असल्याची तुफान चर्चा आहे. परंतु तिच्या आईने या अफवांचे खंडन केले आहे. तिची मुलगी एक सेलिब्रिटी असल्याने लोक तिला कोणाशीही जोडतात असे ती म्हणाली आहे.
ईटाइम्स वृतसंस्थेच्या माहितीनुसार , माहिरा आणि सिराज ‘रोमँटिकली लिंक’ आहेत. दोघांच्या जवळच्या स्त्रोताने सांगितले की दोघे एकमेकांना ओळखत आहेत आणि सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत आहेत.
मात्र, त्यांची मुलगी सिराजला डेट करत असल्याच्या बातम्या इंटरनेटवर पसरल्यानंतर सानिया शर्माने सांगितले की, “काय? तुम्ही काय म्हणताय? असं काही नाही. लोक काहीही बोलतात. आता माझी मुलगी सेलिब्रिटी आहे. लोक तिचे नाव कोणाशी जोडतील, तर ते तसेच आहे असे मानायचे का?”
गायिका आशा भोसलेंच्या नातीसोबतही जोडले गेले होते नाव
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले 29 वर्षीय क्रिकेटर सिराजला डेट करत असल्याची चर्चा होती. अफवा व्हायरल झाल्यानंतर, जनाई आणि सिराज यांनी त्यांच्या नात्याबद्दल गोष्टी क्लिअर करत आणि एकमेकांचे भाऊ-बहीण असल्याचे सांगितले.