शरद कृषीच्या शुभम चव्हाणची विद्यापीठ संघात निवड
जैनापूर (प्रतिनिधी) : येथील जैनापूर येथील शरद कृषि महाविद्यालयाच्या कु. शुभम दिपक चव्हाण या विद्यार्थ्याची महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या भारोत्तोलन संघामध्ये निवड झाली आहे. आचार्य नागार्जुन विश्वविद्यापीठ जि. गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे दक्षिण उत्तर आंतर विद्यापीठ भारोत्तोलन स्पर्धा होणार आहेत.
संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी कु. शुभम चव्हाण यांचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिला. प्राचार्य डॉ. सारिका कोळी, क्रीडा शिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.