सीआयडी कस्टडीत वाल्मिक कराडची प्रकृती खालावली;रात्री ऑक्सिजन लावावा लागला

सीआयडी कस्टडीत वाल्मिक कराडची प्रकृती खालावली;रात्री ऑक्सिजन लावावा लागला

बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराडवर वाल्मिक गंभीर आरोप होत असून पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींच्या खंडणी मागितल्याच्या प्रकरणात कराड मुख्य आरोपी आहे. मागच्या दोन दिवसापासून सीआयडी कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराडची कस्टडीत असताना प्रकृती खालावली. काल रात्री सुद्धा त्याला ऑक्सीजन लावावा लागला होता.

वाल्मिक कराड याला दुसऱ्या दिवशीही अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन लावला गेला होता. मागच्या दोन दिवसापासून सीआयडी कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराड याला कस्टडीत असताना रात्री सुद्धा ऑक्सिजन लावावा लागला होता. कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराडला नियमित गोळ्या औषध घ्यावी लागतात, यातच दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला रात्री अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन लावण्यात आला होता. मागच्या दोन दिवसापासून कस्टडी मध्ये त्याची वैद्यकीय तपासणी झाली, रात्री वाल्मीक कराड याने खिचडी खाल्ली.

श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे लावला ऑक्सिजन

मधील संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर वाल्मिक कराडची मंगळवारी रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली, त्यांनी रात्री जेवण केलं नसून फक्त अर्धी पोळी खाल्ली असल्याची माहिती आहे. शिवाय वाल्मिक कराड याने सकाळी नाष्टा केला नाही, वाल्मिक कराडला शुगर आहे. त्याचबरोबर त्याला रात्री श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे त्याला तात्पुरता ऑक्सिजन लावला गेला, सध्या वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी सुरू आहे. तर काल देखील त्याला काही वेळ ऑक्सिजन लावण्यात आला होता.

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा.. 

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काऊंटरही केला जाऊ शकतो. त्यामुळे या छोट्या आकाला वाचवा. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काऊंटर करू नका. मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्यासाठी असे होऊ शकते, अशी माहिती मला विश्वसनीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. यावरून काहीही होऊ शकते, अशी या प्रकरणात शक्यता व्यक्त होत असल्याचा दावा विजय वड्डेटीवार यांनी केला आहे.