कोरोनासारख्याच विषाणूजन्य आजाराने चीन त्रस्त

कोरोनासारख्याच विषाणूजन्य आजाराने चीन त्रस्त

मुंबई : पाच वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यातच चीनमधील वुहान शहरातून रुग्णांना लागण झालेल्या नॉवेल कोरोना या  विषाणूजन्य आजाराणे जग व्यापले होते. या महासाथीने मोठ्या संख्येने मुत्यू झाले होते. आता डिसेंबर २०२४ पासून वुहान मधूनच ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही ) वेगाने पसरत आहे. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास दम लागणे आणि घशात त्रास अशी लक्षणे ही ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरसची आहेत.

 ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरसमुळे आतापर्यंत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची देखील धक्कादायक माहिती ही पुढे आली आहे.  चीनमधील राष्ट्रीय रोग नियंत्रण आणि प्रतिबंध प्रशासन प्रयोगशाळांसाठी प्रकरणे नोंदवण्यासाठी आणि रोग नियंत्रण संस्थांना त्यांची पडताळणी आणि व्यवस्थापित करण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहे. 

ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरसची लक्षणे देखील जवळपास करोनासारखीच आहेत. रॉयटर्सच्या अहवालात असे म्हटले आहे की, चीनचे रोग नियंत्रण प्राधिकरण अज्ञात उत्पत्तीच्या प्रकरणांवर पूर्णपणे लक्ष ठेवण्यासाठी नवीन प्रणाली चालवत आहे.