खा. संजय राऊतांनी 'या' नेत्यांना दिल्या नागपंचमीच्या अनोख्या शुभेच्छा

खा. संजय राऊतांनी 'या' नेत्यांना दिल्या नागपंचमीच्या अनोख्या शुभेच्छा

मुंबई - राज्यात नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. महिलांमध्ये विशेष भक्तिभावाने हा सण साजरा केला जातो. पारंपरिक रीतिरिवाजांमध्ये फेर धरणे, झोके खेळणे अशा गोष्टी पूर्वीप्रमाणे कमी प्रमाणात दिसत असल्या तरी, अनेक भागांमध्ये आजही नागपंचमी उत्साहाने साजरी केली जाते. या सणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातही हालचाली वाढल्या आहेत. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, “मिंधे आणि अजित गटातील सगळ्यांना नागपंचमीच्या विशेष शुभेच्छा!” या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

https://x.com/rautsanjay61/status/1950086040649113954

खा. संजय राऊतांनी या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला. राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनाही टॅग केले असून, या प्रकारामुळे राजकीय चर्चांना नवीन विषय मिळाला आहे.

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वळण आले. महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेत बंड होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडत गुवाहाटी गाठले आणि स्वतंत्र गट तयार केला. त्यानंतर पक्षाचे नाव, चिन्ह यावर दावे सुरू झाले. त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून फूट काढून महायुती सरकारमध्ये प्रवेश केला. या घडामोडींमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले. आता खा. संजय राऊत यांनी नागपंचमीच्या निमित्ताने या नेत्यांना लक्ष्य करत पुन्हा राजकीय टीका सुरू केली आहे.