HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेचे एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेचे एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्हा परिषद कोल्हापूर कडील दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. स्पर्धेची सुरुवात महिला क्रिकेट खेळापासून करणेत आली. मेरी वेदर ग्राउंड येथे सकाळी 10 वाजता सुरु झाल्या. स्पर्धेचे उदघाटन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन. एस यांच्या शुभ हस्ते करणेत आले. 

  महिला क्रिकेट स्पर्धेसाठी एकूण 14 संघ सहभागी झाले होते. ‍ पहिल्या फेरीमध्ये पंचायत समिती करवीर विरुध्द भुदरगड संघामध्ये करवीर विजयी, हातकणंगले विरुध्द कागल मध्ये कागल विजयी, मुख्यालय विरुध्द गगनबावडा मध्ये मुख्यालय विजयी, राधानगरी विरुध्द ‍ शिरोळ मध्ये राधानगरी विजयी, गडहिंग्लज विरुध्द शाहूवाडी मध्ये गडहिंग्लज विजयी 

          दुस-या फेरीमध्ये पंचायत समिती करवीर विरुध्द राधानगरी मध्ये करवीर विजयी, गडहिंग्लज विरुध्द चंदगड मध्ये गडहिंग्लज विजयी, यानंतर सेमिफायनल मध्ये पंचायत समिती करवीर विरुध्द कागल व मुख्यालय विरुध्द गडहिंग्लज यांच्यात सामना झाला या सामन्यामध्ये अनुक्रमे पंचायत समिती कागल व मुख्यालय संघ विजयी झाले. अंतिम सामना पंचायत समिती कागल विरुध्द मुख्यालय या संघामध्ये झाला त्यामध्ये पंचायत समिती कागलने प्रथम क्रमांक पटकाविला तर ‍ व्दितीय क्रमांक मुख्यालय व तृतीय क्रमांक करवीरने पटकाविला. या स्पर्धेचा आनंद लुटणेस महिला अधिकारी , कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होत्या. यानंतर पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धा 14 जानेवारी रोजी शास्त्रीनगर मैदानावर संपन्न होणार आहेत.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.