नोकरी मेळाव्यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी नावे नोंदवावीत - ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुनर्वास महानिदेशालय, रक्षा मंत्रालय, न्यु दिल्ली (DGR) या कार्यालयाकडून नोकरी मेळाव्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांच्या नोंदी घेऊन त्याबाबतचा माजी सैनिकांचा तपशिल मागविण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकरी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीकरिता पुनर्वास महानिदेशालय, रक्षा मंत्रालय, न्यु दिल्ली (DGR) यांच्या www.esmhire.com ईमेल वर व दूरध्वनी क्र. 011-26100313 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क साधावा, असेही डॉ. चवदार यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.