जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र संघर्ष अभियान चा पाठिंबा

जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र संघर्ष अभियान चा पाठिंबा

लातूर जिल्हा -अरविंद पत्की   

भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये पेन्शन स्कीम बंद करण्यात आली. शासकीय कर्मचाऱ्याने जुनी पेन्शन स्कीम सुरू करावी म्हणून दि. १४ मार्च पासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. कामगारांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र संघर्ष अभियान या सामाजिक संघटनेने पूर्ण पाठिंबा दिला आहे. पेन्शन चालू झाली पाहिजे ही आमची सुद्धा आणि मागणी असल्याची स्पष्ट भुमिका बाबासाहेब सुर्यवंशी यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यभर जुन्या पेन्शन लागु करण्यासाठी सरकारी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. जवळपास१८ लाख कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी असुन या आंदोलनात १० ते १२ मुद्दे सरकारकडे ठेवण्यात आले असून जोपर्यंत या सर्व मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असुन या आंदोलनास महाराष्ट्र संघर्ष अभियान कर्मचाऱ्यांच्या बाजुने ठामपणे पाठिशी उभी असुन यासंदर्भात समर्थनाचे निवेदनही संबंधित विभागाना देण्यात आले असल्याची माहिती बाबासाहेब सुर्यवंशी यांनी दिली आहे.