तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींची अश्वमेध क्रीडा स्पर्धा -२०२५ बास्केटबॉल स्पर्धेत उकृष्ट कामगिरी

तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींची अश्वमेध क्रीडा स्पर्धा -२०२५ बास्केटबॉल स्पर्धेत उकृष्ट कामगिरी

वारणानगर :  येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींनी २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा  स्पर्धेत (अश्वमेध क्रीडा स्पर्धा -२०२५) उकृष्ट कामगिरी करीत शिवाजी विद्यापीठ संघास द्वितीय क्रमांक मिळवून दिला. 

शिवाजी विद्यापीठ महिला बास्केटबॉल संघाने चंद्रपूर येथे झालेल्या २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा  स्पर्धेत (अश्वमेध क्रीडा स्पर्धा -२०२५) द्वितीय क्रमांक मिळविला. या संघात तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुर्वा भोसले, मनस्वी मोरे, निर्झरा पाटील जाधव, श्रावणी भोसले, वृषाली निकम यांनी सहभाग नोंदविला व संघास द्वितीय क्रमांक मिळवून दिला.

या खेळाडूना श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे, अध्यक्ष  आमदार विनय कोरे,  श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी,  डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, संचालक, विद्यार्थी विकास, डॉ कल्पना पाटील,  अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी. एन. माने, विभागप्रमुख, डॉ. पी. व्ही. मुळीक यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच जिमखाना प्रमुख  प्रितेश पाटील व  क्रीडा प्रशिक्षक  उदय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.