त्या" अनधिकृत कमानीचे बांधकाम थांबवा, अन्यथा... ; स्थानिक नागरिकांकडून इशारा

त्या" अनधिकृत कमानीचे बांधकाम थांबवा, अन्यथा... ; स्थानिक नागरिकांकडून इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट वाठार तर्फ वडगाव यांच्या मार्फत हायवे पासून पटाईत वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृत कमान उभी करण्याचे काम सुरू केले आहे.

यासंदर्भात वाठार तर्फ आणि वडगाव येथील विद्यमान लोकनियुक्त सरपंचानी अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष विजयसिंह माने यांना नोटीस बजावली आहे.तसेच हातकनंगले येथील गटविकास अधिकारी आणि वडगाव पोलीस ठाणे येथे या अनधिकृत कमानी बाबतीत पत्र दिले आहे.

या अनधि

कृत कमानीचे बांधकाम तातडीने बंद करून त्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांकडून देण्यात आलाय.