राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील जनावरांना लम्पीची लागण

राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील जनावरांना लम्पीची लागण
राधानगरी तालुक्यात पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव

शमशुद्दिन जमादार / राधानगरी, प्रतिनिधी


राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावात जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील दूध उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या पूर्ण अंगावर पुरळ येतात. जनावरांना खाज सुटते आणि तापही येतो. सात दिवसात त्याच्यावर उपाय न झाल्यास जनावर दगावण्याची शक्यताही असते. त्यामुळे गावातील पशुपालक मोठ्या चिंतेत सापडले आहेत.

जनावरांमध्ये हा रोग आढळल्यानंतर उपाययोजनांसाठी जिल्हा परिषद आणि गोकुळ दूध संघाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत दगावलेली जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत देण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यांकडून होत आहे.