पडखंबेत गव्यांच्या धडकेत म्हैस ठार

पडखंबेत गव्यांच्या धडकेत म्हैस ठार

कोल्हापूर - भुदरगड तालुक्यातील पडखंबे गावात शेतकरी अनिल देसाई हे सोमवारी संध्याकाळी आपल्या शेतातून घरी जात असताना अचानक गव्यांचा कळप त्यांच्या म्हैशींच्या कळपामध्ये शिरला असता अनिल देसाई हे घटनास्थळावरुन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हैशींना तिथेच ठेवून दूर गेले. गव्यांचा कळप आल्या मार्गे परत गेल्याचे पाहून देसाई म्हैशींच्या कळपाजवळ आले असता, एक म्हैस जखमी अवस्थेत आढळली. बाकीच्या म्हैशींना ते घरी घेऊन गेले आणि नंतर येऊन त्यांनी पाहिले तर जखमी अवस्थेत असलेली म्हैस मृत पावली होती. 

घडलेल्या घटनेची माहिती त्यांनी वनविभागाला दिली असता वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोस्टमार्टम पशुवैद्यकीय प्रथम श्रेणी अधिकारी डॉ. निमसे यांनी केले. 

गव्यांचा कळप गावात आणि शेतात येणार नाही याची दक्षता वन विभागाने घ्यावी. त्याचबरोबर झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित किंमतीच्या 100 टक्के मिळावी. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वनविभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली. 

यावेळी पोलीस पाटील अशोकराव गुरव,पंच प्रकाश जाधव,रमेश रायजादे तसेच वनविभागाचे वनक्षेत्रपाल शिंदे, वनरक्षक तांबेकर, मोरबाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.