वारणा धरण व्यवस्थापनेकडून सतर्कतेचा इशारा
वारणा धरण : जिल्ह्यासह शहरात मुसळधार पावसाने नदी पाणी पातळीत वाढ होत आहे. आज दि. २४/७/२०२४, स. ११.३० वा वारणा धरणातून सद्यस्थीत सूरु असलेल्या ३८०० क्यूसेक विसर्गात वाढ करुन वक्र द्वार द्वारे ७२१६ क्युसेक व विद्युत जनित्र मधून १६५८ क्यूसेक असे एकुण ८८७४ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात अली आहे. वारणा धारण व्यवस्थापनेकडून तरी नदीकाठ च्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.