जिंतूर विधानसभा मतदार संघातील कामासाठी 70 कोटी रुपये निधी मंजूर

जिंतूर विधानसभा  मतदार संघातील कामासाठी 70 कोटी रुपये निधी मंजूर

सेलू प्रतिनिधी गणेश हरिश्चंद्र साडेगावकर 

अर्थ संकल्पीय अधिवेशन 2023-24 मध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघासाठी 70 कोटी रुपयांचा विकास् कामे निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांनी दिली.

आपल्या मतदार संघातील रस्यांची दयनीय अवस्था लक्षात घेत सतत पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्याकडून 70 कोटी रुपयांची सेलू आणि जिंतूर तालुक्यासाठी रस्त्यासाठी कामे मंजूर करून आणली आहेत.

जिंतूर तालुका:-

 जिंतूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय बांधकाम करणे -2 कोटी,राज्य मार्ग (248 )सावंगी म्हाळसा इटोली वस्सा आसेगाव रस्ता 4 कोटी,जिल्हा सरहद वडी वाघी गायके ते दुधनगाव रस्ता ग्रा. मा.(125) 1 कोटी,पिंपळगाव काजळे ते अंबरवाडी रस्ता ग्रा.मा.(65 )1 कोटी 50 लक्ष,प्रजीमा 2 ते हनवतखेडा रस्ता ग्रा.मा.(53) 1 कोटी, जोड रस्ता भुस्कटवाडी ग्रा.मा.(19) 1 कोटी,प्रजीमा 8 ते टाकाळखोपा रस्ता ग्रा.मा.(20) 1 कोटी,प्ररामा 2 डोनवाडा बेलखेडा कोलदंडी ग्रा.मा.(81) 1 कोटी 50 लक्ष ,कोठा ते कोठा तांडा रस्ता ग्रा.मा.(56) 1 कोटी,मारवाडी गोंधळा नागठाणा ते प्रजीमा 33 रस्ता ग्रा.मा.(119) 1 कोटी 50 लक्ष.

सेलू येथील दुय्यम निबंधक कार्यालय बांधकाम 2 कोटी 15 लक्ष,रा.मा.(253) ढेंगळी पिंपळगाव ,झोडगाव, देवळगाव गात ,डासाळा किमी 8/00 पुलाचे बांधकाम 2 कोटी 50 लक्ष,रा.मा (253) ढेगळी पिंपळगाव झोडगाव देवळगाव गात डासाळा किमी 29/00 पुलाचे बांधकाम 1 कोटी 50 लक्ष, राज्यमार्ग 253 ढेगळी पिंपळगाव झोडगाव देवळगाव गात डासाळा रस्याची सुधारणा करणे 6 कोटी, वाटूर परतूर सेलू कोल्हा वालूर चारठाणा रस्याव्ही सुधारणा 7 कोटी,हातनूर रायपूर चिकलठाणा किमी 6/800 पुलाचे बांधकाम 1 कोटी 50 लक्ष, मोरेगाव हातनूर वालूर बोरी वस्सा किमी 5/00 पुलाचे बांधकाम 3 कोटी अशी कामे मंजूर झाली आहेत