पुण्यात मोबाईल नंबर न दिल्याच्या रागातून तरुणीवर हल्ला

पुण्यात मोबाईल नंबर न दिल्याच्या रागातून तरुणीवर हल्ला
पुण्यात मुलींवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ

कोल्हापूर  / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

पुण्यामध्ये नंबर न दिल्याच्या रागातून तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला तसेच तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. नाना जालिंदर गायकवाड असे आरोपीचे नाव आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात मुलींवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर ब्लेडने हल्ला तसेच विनयभंग केल्याची घटना घडली आहे. नाना जालिंदर हा तरुणीवर प्रेम करत होता. त्याने तरुणीला भर रस्त्यात आडवून तिच्याकडे मोबाईल नंबर मागितला होता. मात्र तरुणीने नंबर देण्यास नकार दिल्याने आरोपीने तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला. या प्रकरणी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.