पुण्यात 16 वर्षाच्या युवतीवर घरात शिरुन बलात्कार

पुण्यात 16 वर्षाच्या युवतीवर घरात शिरुन बलात्कार
पुण्यात 16 वर्षाच्या युवतीवर घरात शिरुन बलात्कार

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र प्रतिनिधी

पुण्यात पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंडाने 16 वर्षाच्या युवतीवर घरात शिरुन बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे. यश धर्मेश कांबळे असे या आरोपीचे नाव आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात. 18 मार्च रोजी मुलगी घरात झोपलेली असताना आरोपीने जबरदस्तीने घरात शिरुन मुलीवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतरही तो वारंवार मुलीची छेड काढत होता. या प्रकाराला कंटाळून शेवटी तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.