प्रख्यात साहित्यिक श्रीधर हेरवाडे यांचे निधन

प्रख्यात साहित्यिक श्रीधर हेरवाडे यांचे निधन

कोल्हापूर : प्रख्यात साहित्यिक प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांचे इचलकरंजी येथे २ जानेवारीला निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८८ वर्षे होते. त्यांच्या मागे कन्या डॉ. सुनीता गाठ, जावई डॉ. राजू गाठ, बहीण, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. 

रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून सुरुवात करून त्यांनी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय असे काम केले. जयसिंगपूर कॉलेजमधून ते प्राचार्य पदावरून निवृत्त  झाल्यावर आनासाहेब डांगे कॉलेजमध्ये महत्वाचे पद भूषविले. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना दक्षिण भारत जैन सभेचे मुखपत्र असलेल्या प्रगती आणि जिनविजय या पाक्षिकाचे संपादकाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. नांदणी  येथून प्रसिद्ध होणाऱ्या सन्मती  मासिक आणि कोल्हापूर येथील लक्ष्मीसेन मठातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या रत्नत्रय या मासिकाचेही संपादकपद त्यांनी भूषविले. लक्ष्मीसेन मठाने सुरु केलेल्या दक्षिण भारत जैन मराठी साहित्य सभेचे ते संस्थापक होते.