केडीसीसी बँकेकडून बेलवळे बुद्रुकमध्ये लाडक्या बहिणींना अर्थसहाय्य वितरण

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने लाडक्या बहिणींसाठी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या माता-भगिनींसाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत उद्योग व व्यवसायासाठी महिलांना ३० हजार रुपये अर्थसाह्य मिळणार आहे. मासिक ९६३ रुपयांच्या अत्यल्प हप्त्यावर बँकेने ही सुविधा सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत बेलवळे बुद्रुक ता. कागल शाखेकडील लाडक्या बहिणींना उद्योग- व्यवसाय उभारणीसाठी अर्थसहाय्य वितरण बँकेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.
यावेळी योगिता उदय पाटील, निर्मला मच्छिंद्र पाटील, पल्लवी नानासाहेब पाटील, मेघा अजित पाटील, लक्ष्मीबाई कृष्णात पाटील, मालुबाई कृष्णा कदम, दिपाली कृष्णा शिंदे, लक्ष्मी हिंदुराव शिंदे, शोभा बाबुराव पाटील, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.