भाजपच्या या मंत्र्यांने दिला राजीनामा

भाजपच्या या मंत्र्यांने दिला राजीनामा

जयपुर: राजस्थानमध्ये भाजप सरकारमधील मंत्री करोडी लाल मीना यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मीना यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर केले होते की, जर त्यांच्या मतदार संघातील कोणती जागा त्यांनी गमावली, तर ते मंत्रीपदाचा राजीनामा देतील. निवडणुकीत काही उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी आपला शब्द पाळत राजीनामा सादर केला. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील भाजपमध्ये खळबळ माजली आहे.