नांदणी येथील मुस्लिम समाजाने पहलगाम हल्ला व मुंबईतील जैन मंदिर पाडल्याचा निषेध व्यक्त केला

कोल्हापूर - पहलगाम दहशतवाद्दी हल्ल्याचा निषेध व मुंबई येथील जैन मंदिर पाडल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज समस्त मुस्लिम समाज नांदणी व नांदणी परिसरातील 6 मस्जिद आणि गावातील सर्व मुस्लिम तरुण मंडळे यांच्या वतीने जुम्मा नमाज पठण केले.
भारतरत्न डॉ. झाकीर हुसेन तरुण मंडळ नांदणी या ठिकाणी दंडाला काळ्या फिती लावून निषेध सभा घेण्यात आली. यावेळी समाजाचे हाफिजी रफिक मुजावर व संजय पटवेकर यांनी आपल्या मनोगतातून दहशतवाद्दी अतिरेक्यानंचा आणि पाकिस्तान देशाचा निषेध व्यक्त केला. तसेच आजची जुम्मा नमाज प्रत्येकाने आपल्या हाताच्या दंडाला काळी रेबीन ( फीत ) लावून अदा केली.
यावेळी समाजाचे चेअरमन हसन मुरसल, मदिना मस्जिदचे सर्व ट्रस्टी, मंडळाचे अध्यक्ष अझहर मुरसल, उपाध्यक्ष फिरोज मुरसल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेरू शेख, खिदमत फौंडेशनचे मौला सादूले, हडक्को मस्जिदचे बाबासाहेब पठाण,सहारा ग्रुपचे खजिनदार असलम शेख,आमदार चिककोडे, जेष्ठ नागरिक शौकत मुरसल, दिलावर पटेल, मन्सूर बाणदार, मुबारक मुरसल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.