तुळशी धरण व्यवस्थापनेकडून सतर्कतेचा इशारा

तुळशी धरण व्यवस्थापनेकडून सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधि) : तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असून जलाशय परिचलन सूची प्रमाणे पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी धरण सांडव्यावरून *आज दिनांक 31/07/2024 रोजी सकाळी 10 वाजता 1500 cusec ने सुरू असलेल्या विसर्गात वाढ करून 2000 cusec इतका विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे.नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.