भाजपाच्या वतीने विजय संकल्प मोटर रॅली उत्साहात संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने रविवार गांधी मैदान येथून भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांची विजय संकल्प मोटर सायकल रॅली उत्साहात संपन्न झाली.
गांधी मैदान येथून रॅलीची सुरवात होताना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपाचा ध्वज हातामध्ये घेऊन तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फलक हातामध्ये घेऊन उत्साहात अनेक घोषणा देत या रॅलीमध्ये सामील झाले होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या विजयाची तयारी म्हणून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपा विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय नागाळा पार्क या ठिकाणी या रॅलीची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, आगामी काळात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत पोहचवणे व यातूनच महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे सरकार पूर्ण बहुमताने कसे येईल यासाठी सर्वांनी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी बोलताना प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, गेल्या अडीच वर्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार त्यांनी खऱ्या अर्थाने समाज उन्नतीसाठी लागणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू केल्या आहेत व त्यामुळेच जनतेनेच ठरवले आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार नक्की.
या याप्रसंगी सत्यजित उर्फ नाना कदम, राहुल चिकोडे, संजय सावंत, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, डॉक्टर राजवर्धन, यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही विजय संकल्प मोटरसायकल रॅली यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चा अध्यक्ष गिरीष साळोखे व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा रूपाराणी निकम, राजू मोरे, अतुल चव्हाण, अमर साठे, , मंडलाध्यक्ष प्रकाश सरनाईक, विशाल शिराळकर, सचिन कुलकर्णी, अनिल कामत, प्रज्ञेश हमलाई, अशोक लोहार, रामसिंग मोर्य, सतीश अंबर्डेकर, दिलीप बोंद्रे, रविकिरण गवळी, विजय आगरवाल, संजय जासूद, कोमल देसाई, माधुरी कुलकर्णी, रीमा पालनकर, रश्मी साळुंखे, अवधूत भाटे, विवेक कुलकर्णी, रोहित कारंडे अरविंद वडगावकर, राजाराम नरके, सचिन पवार, विश्वजीत पवार, सुजाता पाटील, सुमित पारखे, विश्वजीत पवार, दिग्विजय कालेकर, युवराज शिंदे, विशाल पाटील आदी उपस्थित होते.