भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भाजप स्थापना दिन उत्साहात संपन्न..!

भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भाजप स्थापना दिन उत्साहात संपन्न..!

कोल्हापूर - आज 6 एप्रिल भारतीय जनता पार्टीचा 45 वा स्थापना दिवस भाजप कोल्हापूरच्या वतीने संपूर्ण शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज शहराच्या सात मंडळामध्ये साखर पेढे वाटून, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, जय श्रीराम अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीच्या इतिहासाबद्दल मनोगत व्यक्त केले. जगातील सर्वांत मोठी संघटना असणारा पक्ष म्हणजे 'भारतीय जनता पक्ष'. राष्ट्र प्रथम हा विचार ठेऊन विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी कार्यरत भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस. आजच्या या मंगल दिवसाचे औचित्य साधून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा स्वतःच्या घरावर फडकवला. शहरातील या नियोजित कार्यक्रमानंतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुपारी 01 वाजता एकत्र येत जिल्हा कार्यालयामध्ये सर्वांनी संघटन पर्व कार्यकर्ता संवाद या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

यावेळी प्रदेश सचिव महेश जाधव, प्र.का.सदस्य राहूल चिकोडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रवास, इतिहास, कार्यपद्धती, विविध नेत्यांसोबत काम करताना आलेले अनुभव याबद्दल मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धती बद्दल नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचे उदाहरण देत सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघटनात्मक रचनेमुळे मंत्री पदाला गवसणी घालतो असे सांगत त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याचा आढावा उपस्थितांना सांगितला. 

यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. सर्वप्रथम भाजप स्थापना दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी राज्यात भारतीय जनता पार्टीचे दीड कोटी सभासद पूर्ण झाल्याबद्दल सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा देशामध्ये आपलं सरकार स्थापित केलं यामुळे देशाची वाटचाल विकसित भारताकडे चाललेली आहे. "राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः" हा भाजप विचार अंगिकारत, अंत्योदयाच्या मार्गावर भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता अविरत वाटचाल करत आहे. देशात १६ राज्यामध्ये आपले सरकार असून २१ राज्यात मित्र पक्षांसोबत भाजपा शासनामध्ये आहे. हे सर्व होत असताना भाजपाने लोकशाही सोडली नाही आणि घराणेशाही अवलंबली नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपले नेते माननीय गडकरी साहेब असतील किंवा आपल्या महाराष्ट्रातले जे वेगवेगळे आपले केंद्रीय मंत्री आहेत हे केंद्रातील राज्यात्म आपण मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध विकासकामांची माहिती त्यांनी यावेळी सांगितली.

आपला प्रवास तेजस्वी असून आणखी अनेक गोष्टी बाकी आहेत या पूर्ण करण्यासाठी येना-या आगामी निवडनुकांसाठी सज्ज रहावे लागेल. प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षाचा रोड मॅप मांडल्याप्रमाणे आपण सर्वांनी आजच्या दिवशी संकल्प करुया कि, भारतीय जनता पार्टी हि सातत्याने या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरीता निवडणून येत राहील. याकरिता आपला पायवा अखंड करू, मजबूत करूया त्यासोबत सातत्याने सामान्य माणसाचा विचार करून आपल्या मनामध्ये राहील अशा प्रकारचा संकल्प करूया हा पक्ष महान आहे त्याला अधिक महान कसा बनवता येईल आणि त्याच्यामध्ये छोटेसे योगदान आपलं कसं राहील अशा प्रकारचा संकल्प आजच्या दिवशी आपण सगळे मिळून करूया असे आवाहन यावेळी केले.  

यावेळी मामा कोळवणकर, संपतराव पवार, दिलीप मेत्रानी, प्रमोदिनी हार्डीकर, किशोरी स्वामी, प्रभावती इनामदार, डॉ. राजवर्धन, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, विराज चिखलीकर, अप्पा लाड, राजू मोरे, शैलेश पाटील, गणेश देसाई, उमा इंगळे, धनश्री तोडकर, भरत काळे, संतोष भिवटे, मंगला निप्पानीकर, आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.