HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

माझ्या काळात मंजूर झालेल्या अठरा पैकी बारा बंधाऱ्यांचा अद्याप मुहूर्त काढला नाहीत, आणि विकासकामांची टिमकी कशाला वाजवता?- के पी पाटील

माझ्या काळात मंजूर झालेल्या अठरा पैकी बारा बंधाऱ्यांचा अद्याप मुहूर्त काढला नाहीत, आणि विकासकामांची टिमकी कशाला वाजवता?-  के पी पाटील

राधानगरी (प्रतिनिधी)  : मी आमदार असताना लोंढा नाला लघुपाटबंधारे तलावाखाली कोल्हापूर पद्धतीचे अठरा बंधारे मंजूर झाले होते. त्यापैकी तब्बल बारा बंधाऱ्यांच्या कामाला अजून तुम्ही सुरुवातही केली नाही, आणि मग तुम्ही मतदारसंघात विकासकामे केल्याची टिमकी कशाला वाजवता? अशी बोचरी टीका माजी आमदार के पी पाटील यांनी विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर केली.

शिरगाव (ता.राधानगरी) येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले,"धामोड परिसरातील डोंगराळ भाग सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी पाणी अडवण्याच्या हेतुने माझ्या काळात अठरा बंधारे मंजूर झाले होते. विद्यमान आमदारांनी त्यापैकी अवचितवाडी जवळचे काम दोन वर्षे रेंगाळलेल्या स्थितीत ठेवले असून बारा बंधाऱ्यांच्या कामाला अद्याप त्यांनी सुरुवातच केलेली नाही. तेथील शेतीसाठी या बंधाऱ्यांची गरज असताना त्याकडे कमालीचे दुर्लक्ष करणारे विद्यमान आमदार विकास कामांच्या मोठ्या गप्पा मारण्यात मश्गूल आहेत. त्या परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध झाल्यास तेथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल याकडे विद्यमान आमदारांचे साफ दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता व असंतोष आहे. म्हणूनच विधानसभेत गेल्यानंतर मी हा प्रश्न प्राधान्याने हाताळणार आहे."

ज्येष्ठ नेते शामराव देसाई म्हणाले,"भुदरगड तालुक्यात आता आबिटकर विरोधी नाराजीची मोठी लाट तयार झाली असून तेच वातावरण राधानगरी व आजरा तालुक्यातही पाहायला मिळत आहे. रात्र वैऱ्याची असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक दिलाने या निवडणुकीला सामोरे जाऊन के पी पाटील यांचा विजय पक्का करूया."

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक आर के मोरे,भोगावती कारखान्याचे माजी संचालक ए डी चौगले, दीपसिंह नवणे आदींची भाषणे झाली.

माजी सभापती संजयसिंह कलिकते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सभेला ज्येष्ठ नेते पी डी धुंदरे,सदाशिवराव चरापले,धैर्यशील पाटील- कौलवकर,राहुल देसाई, सुरेश चौगले, संग्रामसिंह कलिकते, प्रसाद पिल्लारे, विजय व्हरकट, प्रशांत पाटील आदींसह महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. बाजीराव महाडेश्वर यांनी आभार मानले.

सभेपूर्वी केळोशी, अवचितवाडी,कुंभारवाडी, सुतारवाडी,धनगरवाडी, माळवाडी,पिलारवाडी, आपटाळ,जाधववाडी, कुरणेवाडी,खामकरवाडी आदी गावे व वाड्यावस्त्यांवर प्रचार दौरा झाला.

*टक्केवारीत जुळले नाही म्हणून .....?* 

के पी पाटील म्हणाले,"मंजूर असलेल्या बारा बंधाऱ्यांच्या पायासाठी एक दगडही विद्यमान आमदारांच्या काळात रचलेला नाही. याबाबत परिसरातील शेतकरी अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहेत. ही कामे रेंगाळण्याचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी टक्केवारीत जुळले नाही की काय? म्हणूनच या कामांना सुरुवात झाली नसल्याची चर्चा आता सगळीकडे रंगू लागली आहे."

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.