नाट्य व भक्तीपर गीतांवर आधारित भरतनाट्यम नृत्याने केले मंत्रमुग्ध

नाट्य व भक्तीपर गीतांवर आधारित भरतनाट्यम नृत्याने केले मंत्रमुग्ध

कागल : येथे प्रभू श्री राम यांचे जीवनावर आधारित नाट्य व भक्तीपर गीतांवर आधारित भारतनाट्यम नृत्याने रसिक महिला मंत्रमुग्ध झाल्या.श्री रामनवमी निमित्त श्रीराम मंदिर देवस्थान जिर्णोद्धार समितीच्यावतीने खास महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

राज्य साखर संघाच्या संचालिका व शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे,राजे बँकेच्या अध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे, सौ श्रेयादेवी घाटगे,नृत्यचंद्रिका,नृत्य सरस्वती व नृत्य तपस्वीनी अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानीत तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळविलेल्या ख्यातनाम नर्तिका संयोगिता पाटील,प्रितेश रणनवरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व सहभागी कलाकारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.

प्रभू श्रीराम नामाच्या जपाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर राम जन्म, विनायक स्तुती,सीता स्वयंवर, सेतुबंध,कल्याण राम मंगलम,श्रीराम कौतुकम,पुष्पांजली अशा चरणातून प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील प्रसंग भरतनाट्यमच्या माध्यमातून व्यासपीठावर बालकलाकारांनी हुबेहूब साकारले.

कोल्हापूरच्या तपस्यासिद्धी स्कूल आॕफ भरतनाट्यम व प्रतीनंद कला मंदिरचे तीसहून अधिक कलाकार यामध्ये सहभागी झाले. संयोगिता पाटील व प्रितेश रणनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण केले.या सर्वच सादरीकरणास उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत सहभागी कलाकारांना प्रोत्साहन दिले.

दरम्यान रविवारी(ता.६) दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात येणार आहे.या सर्व कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

खास महिलांसाठी भरतनाट्यम कार्यक्रमाचे आयोजन

भरतनाट्यमचा हा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित केला होता. त्यास कागलसह परिसरातील महिलांनी उत्सफुर्त प्रतिसाद दर्शविला.महिलांच्या उपस्थितीने सभागृह खचाखच भरले होते. या सर्वांग सुंदर सोहळ्यात उपस्थित महिलांमध्ये राज परिवारातील महिलांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.