मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध उचगावमध्ये करवीर शिवसेनेची निदर्शने

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध  उचगावमध्ये करवीर शिवसेनेची निदर्शने

कोल्हापूर प्रतिनिधी मुबारक आत्तार 

उचगाव : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बाबरी मशीद विषयावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत करवीर शिवसेनेने (उद्धव ठाकरे) उचगाव (ता करवीर) येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

उचगाव मुख्य प्रवेशद्वारानजीक छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या निदर्शनावेळी शिवसैनिकांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी बाळासाहेब ठाकरे यांनी सिंहगर्जना केली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते कोठे होते, चंद्रकांत पाटील कुठे लपले होते? यापुढे असे बेताल व्यक्तव्य शिवसेना कदापि सहन करणार नाही. चंद्रकांत पाटील यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उपजिल्हाप्रमुख पोपत दांगट यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिकांनी एकच जयघोष केला.

  या

वेळी तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपतालुकप्रमुख दीपक पाटील, गावप्रमुख दीपक रेडेकर, उपसरपंच विराग करी, हिंदुत्ववादी शरद माळी, ग्रा.पं.सदस्य अरविंद शिंदे, वैभव पाटील,कैलास जाधव, युवासेनेचे सागर पाटील, संतोष चौगुले, बंडू घोरपडे, सचिन नागटीळक, योगेश लोहार,लालू चौगुले, सचिन पोवार, अजित चव्हाण, बाबुराव पाटील, इमाम पठाण, आकाश आवळे, उत्तम घोडके, प्रतीक घोलपे, शौफिक, दीपक पोपटाणी, दीपक धिंग, दीपक पोपटाणी आदी उपस्थित होते.