HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शाहू कारखान्यावर,टी.डी.एस. व 'टॅक्स डिडक्शन अ‍ॅट सोर्स' विषयक मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न

शाहू कारखान्यावर,टी.डी.एस. व 'टॅक्स डिडक्शन अ‍ॅट सोर्स' विषयक मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न

कागल (प्रतिनिधी) : कागल येथील श्री. छत्रपती शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर करदात्यांमध्ये करसाक्षरता वाढावी, तसेच टी.डी.एस.या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर समज वाढावी, यासाठी आयोजित करण्यात आलेले मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न झाले. आयकर अधिकारी एकनाथ पाटील यांनी उपस्थितांना माहितीपूर्ण व सुलभ भाषेत मार्गदर्शन केले. 

आयकर अधिकारी एकनाथ पाटील म्हणाले, भाषणात टी.डी.एस. म्हणजे काय, तो कुठे आणि कधी कापला जातो, याची मूलभूत माहिती दिली. तसेच वेतन, भाडे, व्याज, व्यावसायिक फी, ठेकेदार यांच्याशी संबंधित विविध कलमांतर्गत टी.डी.एस. कपातीचे नियम, दर व वेळापत्रक स्पष्ट केले. 'कर कायद्यातील अलीकडील बदल' आणि 'ऑनलाईन टी.डी.एस. रिटर्न भरण्याच्या पद्धती' यावरही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.यावेळी टीडीएस कायदा व त्याचे महत्त्व,विविध कलमांनुसार कपात होणारे दर,टीएडएस भरण्याच्या वेळा व अंतिम तारखा, तो वेळेत न भरल्यास दंडात्मक कारवाई,ऑनलाईन  फाइलिंग व ट्रेसेस पोर्टलचा वापर या विषयावरही सविस्तर माहिती दिली. शेवटी टी.डी.एस्. व टॕक्स वेळेत भरुन संभाव्य अडचणी टाळा,असे आवाहन पाटील यांनी केले.

शाहू साखर कारखान्याचे संचालक व सीए डाॕ.डी.एस.पाटील यांनी आर्थिक व्यवहार व इन्कम टॅक्सप्रणाली बाबत सविस्तर माहिती दिली.

स्वागत फायनान्स मॕनेजर आर.एस.पाटील यांनी केले.राजे बँकेचे कार्यकारी संचालक अरुण पाटील यांनी आभार मानले.

यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, सागर घाटे,आयुष कुमार ,अनिल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याचबरोबर, चर्चासत्रास शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.