रस्ता चौपदरीकरणासाठी तोडलेल्या झाडामुळे ट्रकचा अपघात

मलकापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर रत्नागिरी चौपदरीकरणासाठी रस्त्याकडील झाडे तोडून संबंधीत ठेकेदार बाजूपट्टीवरच झाडाचे ढीग लावत असल्याने तोडलेली झाडे अपघाताला निमंत्रण देत आहेत.वारूळ गावानजीक डाव्याबाजूला ठेवलेल्या ओढक्याला धडक बसून (एम. एच. 42 बी पी 9763) सोळा चाकी ट्रक उजव्या बाजूवरील खड्यात जावून अडकला.
सुदैवाने चालक बचावला.शनिवारी मध्यरात्री नंतर हा अपघात झाला. या अपघातानंतर ग्रामस्थांनी संबंधीत ठेकेदाराला याबाबत जाब विचारला. झाडे वाहतूकीला परवाना पास वेळेत मिळत नसल्याने झाडे हलविता येत नसल्याचे ठेकेदाराने स्पष्ट केले.