मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज मानव अधिकार रक्षक मंचच्यावतीने दसरा चौकात निदर्शने करण्यात आली.
मोदी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला. मणिपूर घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मानव अधिकार रक्षक मंचच्यावतीने करण्यात आली.
यावेळी मानव अधिकार रक्षक मंचचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष निखिल मोरे, मोतीलाल चव्हाण, दिलीप लोखंडे, सागर मरळकर, महेश लोखंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.