शाहू साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी रमेश माळी यांची निवड

शाहू साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी रमेश माळी यांची निवड

कागल प्रतिनिधी : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी कागलच्या रमेश माळी यांची निवड झाली. कारखान्याच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे या प्रधान कार्यालयात झालेल्या विशेष सभेत ही निवड झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे होत्या.

   निवडीनंतर श्रीमती घाटगे यांच्या हस्ते नूतन संचालक माळी यांचा सत्कार केला.

यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, सर्व संचालक,संचालिका रेखा पाटील, सुजाता तोरस्कर, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.