महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ रवाना

कोल्हापूर : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे १८ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा अथलेटिक्स पुरुष व महिला , व्हॉलीबॉल पुरुष व महिला , कबड्डी पुरुष व महिला , खो-खो पुरुष व महिला , बॅडमिंटन पुरुष व महिला , बास्केटबॉल पुरुष व महिला , टेबलटेनिस पुरुष व महिला , बुद्धिबळ पुरुष व महिला या सर्व क्रीडा प्रकारात 76 पुरुष व 76 महिला खेळाडू त्याचबरोबर २० प्रशिक्षक व संघव्यवस्थापक असा १७२ जण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.
या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा डॉ.डी.टी. शिर्के ,प्र-कुलगुरु प्रा. डॉ. डी. पी. एस. पाटील, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, पथक प्रमुख प्रा. डॉ. एन.डी. पाटील, प्रा.डॉ. सुनिल चव्हाण , प्रा. किरण पाटील,डॉ संजय पाटील, डॉ. आकाश बनसोडे, डॉ. देवेंद्र बिरनाळे, डॉ. श्रीदेवी पवार, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. रमेश पाटील, प्रा हर्षल पाचोरे , डॉ. संदीप पाटील, डॉ. गणेश सिंहासने, डॉ. राजेंद्र रायकर, सुचय खोपडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने पालक व खेळाडू उपस्थित होते.