मोठी बातमी! पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी

मोठी बातमी! पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी

मुंबई प्रतिनिधी : विधान परिषदेची निवडणूक पुढील महिन्यात होत असून भाजपचे उमेदवार पाच जागांवर निवडून येतील. या जागांवर उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक नेते वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. तर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजपा) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना महाराष्ट्र विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे.विधान परिषदेतील निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आणि राजकीय हालचालींवर याचं  प्रभाव कसा पडेल, हे लवकरच कळेल.