HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शिवाजी विद्यापिठातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांना कायमची सुट्टी द्या-युवासेनेची मागणी

शिवाजी विद्यापिठातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांना कायमची सुट्टी द्या-युवासेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  गेली अनेक महिने विद्यापिठामध्ये चालू असलेली पेपर फुटी ची समस्या, परीक्षा विभागातील गोंधळ,हॉस्टेलची दुरावस्था, स्पोर्ट्स विभागातील बनावट प्रमाणपत्रे प्रकरण, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, आणि आता नुकतेच समोर आलेले विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाची बनावट पदवी काढून  चक्क चीनमध्ये वापरण्यात आली आहेत. विद्यापीठातले अनेक विभागाचे अनेक अधिकारी फक्त आयाराम - गयाराम पद्धतीने काम करत आहेत. पण अशा त्यांच्या निष्क्रिय वागण्यामुळे शिवाजी विद्यापीठ हे नाव राष्ट्रभरात व देशभरात बदनाम होत चालला आहे.

त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरू तसेच रजिस्टार यांनी दोषीवर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.. पण तसें होत नाही,असं जर प्रत्येकाला पाठीशी घालण्यात येत असेल तर एक दिवस या विद्यापीठाच्या नावाची दुर्दशा होऊन जाईल, या सगळ्याचा गांभीर्याने विचार करावा.अन्यथा सगळ्याच अधिकाऱ्यांच्या विरोधात येणाऱ्या काही दिवसात उग्र आंदोलन करू असा इशारा युवासेना उबाठा गटाकडून देण्यात आला. अश्या मागणीचे निवेदन युवासेनेच्या वतीने आज देण्यात आले.  यावर रजिस्टार व्ही एन शिंदे यांनी लवकरच यावर चौकशी समिती नेमून गुन्हे दाखल करू असे आश्वासन दिले.

यावेळी उपस्थित युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, शहर समन्व्यक चैतन्य देशपांडे, बंडा लोंढे, शहर चिटणीस अक्षय घाटगे, प्रथमेश देशिंगे, उपशहर प्रमुख कीर्ती जाधव, अभिषेक दाबाडे, विभाग प्रमुख वैभव पाटील, ओंकार रनवरे आदि उपस्तिथ होते. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.