HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू

विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू

 सोल: दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळारवरील धावपट्टीवर विमान उतरत असताना धावपट्टीवरून घसरून सीमाभिंतीवर जाऊन आदळले. त्यानंतर या विमानाने पेट घेतली, रविवारी सकाळी झालेल्या या दुर्घटनेत १७९ जणांचा मृत्यू झाला. बँकॉकहून आलेले विमान धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला.  या विमानाची धावपट्टीवर उतरण्यासाठीची उपकरणे निकामी ठरल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.

दक्षिण कोरियाची राजधानी सोलपासून २८८ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुआन येथे ही दुर्घटना घडली. ‘बोइंग ७३७-८००’ हे विमान ‘जेजू एअर’ ही एअरलाइन्स चालवते. या अपघातग्रस्त विमानात १८१ जण होते. त्यापैकी बहुतांश जण दक्षिण कोरियाचे नागरिक होते, तर दोन जण थायलंडचे नागरिक होते. दक्षिण कोरियातील अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १७९ जणांचा मृत्यू झाला. दोघांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून, रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मृत १७९ जणांपैकी ८५ महिला आणि ८४ पुरुष असून, अन्य दहा जणांची ओळख पटलेली नाही. दुर्घटनेतून बचावलेले दोघे विमानातील कर्मचारी असून, त्यांच्या जीवाला धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.