Opration Sindoor : पाकिस्तानचा प्रतिहल्ल्याचा प्रयत्न फसला ..

Opration Sindoor : पाकिस्तानचा प्रतिहल्ल्याचा प्रयत्न फसला ..

लाहोर - भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' मुळे पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण व्यवस्थेवर निशाणा साधून ती पूर्णपणे निष्क्रिय केली असून, यामध्ये क्षेपणास्त्र लाँचर्सचाही मोठा विध्वंस झाला आहे, अशी माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

पाकिस्तानने चीनकडून मिळवलेली HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली S - 400 च्या तुलनेत फारच मागे असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. HQ-9 प्रणालीला भारताच्या ब्राह्मोससारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा सामना करण्याची क्षमता नाही. दुसरीकडे, भारताची S - 400 प्रणाली 400 किलोमीटरच्या परिघात कार्यरत असून अल्पावधीत प्रतिसाद देण्यास सक्षम आहे.

पाकिस्तानकडून प्रतिहल्ल्याचा प्रयत्न फसला

भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतीय हवाई तळांवर प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला. अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा आणि लुधियाना येथील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र, भारतीय लष्कराच्या सजगतेमुळे हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.

ऑपरेशन सिंदूरमध्ये S - 400 ची महत्त्वपूर्ण भूमिका 

'ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारतीय वायुदलाने पाकिस्तान व पीओकेतील दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ले करून त्यांचा खात्मा केला. हॅमर, स्कॅल्पसारख्या अचूक मारक शस्त्रांसोबत S - 400 प्रणालीने देखील भारतीय हवाई दलाला संरक्षण देत निर्णायक भूमिका बजावली. ही प्रणाली शत्रूच्या कोणत्याही हल्ल्याला त्वरित प्रत्युत्तर देण्यासाठी सदैव सज्ज होती, ज्यामुळे भारतीय विमानांनी अत्यंत यशस्वीपणे आपले मिशन पूर्ण केले.