शिवराज पाटील (दादा) सोशल फाउंडेशन व जनसंपर्क कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन

शिवराज पाटील (दादा) सोशल फाउंडेशन व जनसंपर्क कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) येथील शिवराज पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने प्रभाग क्रमांक 79 व 81 या ठिकाणी विविध उपक्रम राबवून प्रभागामध्ये सार्वजनिक सुविधा देण्यामध्ये विशेष असे उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजसेवेचे कार्य अखंडित सुरू राहण्यासाठी श्री शिवराज पाटील (दादा) सोशल फाउंडेशनचा लोकार्पण सोहळा उद्या गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता नाना शिंदे चौक, दादू चौगुले नगर, बापूराम नगर मेन रोड या ठिकाणी होणार आहे. तरी या प्रभागातील सर्व महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक सर्व तरुण मंडळ व मित्रपरिवार यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे संयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.