समांथा रुथ प्रभू पुन्हा प्रेमात? 'या' दिग्दर्शकाला करत आहे डेट

समांथा रुथ प्रभू पुन्हा प्रेमात? 'या'  दिग्दर्शकाला करत आहे डेट

हैदराबाद : टॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर समांथा आता नव्या नात्यात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

सध्या समांथा प्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरु याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची जोरदार चर्चा आहे. दोघे एकत्र वेळ घालवत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या असून, समांथाने नुकताच राजसोबतचा एक खास सेल्फी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

सेल्फीवरून चर्चेला उधाण
समांथाने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती राजसोबत आनंदी मूडमध्ये दिसून आली. या फोटोवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत असून, त्यांचे नाते अधिकृत असल्याची अटकळ लावली जात आहे.

राज विवाहित, तरीही नवं प्रेम?
या चर्चेत एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. काही चाहत्यांच्या मते, राज निदिमोरु अजूनही त्याची पत्नी श्यामली याच्यासोबत कायदेशीरदृष्ट्या विवाहित आहे. त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील स्थितीबाबत अधिकृत माहिती नसली तरी, समांथासोबतचा वाढता सान्निध्य चर्चेचा विषय ठरत आहे.

समांथाचे भूतकाळातील नाते
समांथाने ऑक्टोबर २०१७ मध्ये नागा चैतन्यसोबत विवाह केला होता. मात्र, २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर, नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न केल्याचे वृत्त समोर आले आणि सध्या ते दोघंही आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी असल्याचे दिसते.