श्री.काडसिद्धेश्वर हायस्कूलच्या पर्यवेक्षकपदी श्री.विजय सरगर यांची नियुक्ती
शाहूवाडी:संजय पाटील
कोजिमचे कार्यवाह, माय मराठी राज्य अध्यापक संघाच्या विद्या समितीचे सहसचिव श्री.विजय सरगर सर यांची श्री.काडसिद्धेश्वर हायस्कूल कणेरी ता.करवीर या प्रशालेच्या पर्यवेक्षकपदी नियुक्ती झाली आहे.शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी, प्रभावी शालेय व्यवस्थापनासाठी श्री.विजय सरगर सर यांच्याकडील उपक्रमशलता, सूक्ष्मनियोजन,प्रभावी तंत्रस्नेही कौशल्य उपयोगी पडणार आहे
श्री.विजय सरगर हे आठवी ते दहावी मराठी विषयाचे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रभावी काम केले आहे
येथे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. *SCERT, बालभारती, ई-बालभारती मध्ये सेतू अभ्यास, प्रश्नपेढी ,स्वाध्याय पुस्तिका, आभासी वर्ग ( व्हर्च्यूअल क्लासरूम )* या ठिकाणी गुणवत्तापूर्ण काम केले आहे. महाराष्ट्रातील मराठी विषयाच्या तज्ज्ञ मार्गदर्शक अध्यापकांच्या बरोबरीने काम केले आहे.*विविध कार्यशाळा,आभासी वर्ग , येथे प्रभावी नमुना पाठ सादर केलेले आहेत. विविध शैक्षणिक साधने, शैक्षणिक व्हिडीओ,पी.पी.टी यांच्या माध्यमातून आनंददायी अध्यापनाचे सादरीकरण केले आहे. जिल्ह्यातील दहावीच्या मराठी विषयाच्या हजारो विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना याविषयीचे कौशल्यपूर्ण आणि प्रभावी मार्गदर्शन केले आहे. या त्यांच्या गुणवत्तापूर्ण कौशल्यांचा, उपक्रमशील- व्यासंगी व्यक्तिमत्त्वाचा उपयोग श्री. काडसिद्धेश्वर हायस्कूलच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होईल याची खात्री वाटते
विजय सरगर सर यांना कोजिम परिवाराच्यावतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शालेय व्यवस्थापनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.