सरपंचावर जीवघेणा हल्ला

सरपंचावर जीवघेणा हल्ला

धाराशिव: काही दिवसापूर्वी बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली असतानाच आता धाराशिवमधील तुळजापुरात सरपंचावर अज्ञातांनी हल्ला केला. मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर गुरुवारी रात्री दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी हा हल्ला केला. त्यांनी कारच्या काचेवर अंडी, दगड आणि पेट्रोल भरलेले फुगे मारले. त्यानंतर निकम यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाला असावा, असा संशय निकम यांनी बोलून दाखवला. विशेष म्हणजे बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याला पवनचक्कीवरुन झालेला वादच कारणीभूत ठरला.

मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम आणि त्यांचे साथीदार प्रविण इंगळे हे दोघे गुरुवारी कारनं तुळजापूरहून जवळगा गावाला जात होते. याचवेळी कारच्या दोन्ही बाजूनं दोन दुचाकी आल्या. दोन्ही दुचाकींवर दोन-दोन जण बसले होते. दोन्ही दुचाकीस्वारांनी एकाचवेळी हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरपंच निकम यांनी कारचा वेग कमी करत दोन्ही दुचाकींना पुढे जाण्यास जागा करुन दिली. यानंतर दुचाकीस्वारांनी निकम यांच्या कारच्या काचेवर दगड मारला. त्यामुळे काच फुटली. हल्लेखोरांनी फुटलेल्या काचेतून पेट्रोलचे फुगे आत फेकले.

दुचाकीस्वार काहीतरी घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचं निकम यांच्या लक्षात आलं. त्यामुळे तिथून निसटण्यासाठी निकम यांनी कारचा वेग वाढवला. तितक्यात दुसऱ्या दुचाकीवरील एकानं निकम यांच्या कारच्या काचेवर अंडं फेकलं. त्यामुळे निकम यांना रस्त्यावरचं काहीच दिसत नव्हतं. कारचा वेग पुन्हा कमी झाला. कारचा वेग कमी झाल्याची संधी साधत हल्लेखोरांनी पुन्हा एकदा दगड आणि पेट्रोलचे फुगे मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कार पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पण निकम यांनी समयसूचकता दाखवली. त्यांनी कार थांबवली नाही. त्यामुळे